फलटण – श्रीराम बझारचे व्यवस्थापक जयराम विश्वनाथ राजमाने वय ५७ यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.श्रीराम बझारचे संस्थापक अध्यक्ष स्व.हणमंतराव पवार अण्णा यांचे अत्यंत विश्वासू म्हणून सण १९९६ पासून श्रीराम बझारचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली असून अतिशय हुशार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी तसेच ग्राहकांचा दुवा म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. श्रीराम बझार वार्षिक ५५ कोटी रुपयांची उलाढाल करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व काहीकाळ सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला अतिशय मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांना परवानगी असल्याने अनेकांना त्यांचे अंतिम संस्काराला उपस्थित राहता आले नाही. दरम्यान ज्या व्यक्तीने रात्रीचा दिवस करून श्रीराम बझारला गतवैभव प्राप्त करून दिले अशा महान अधिकाऱ्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिवाला बझार येथे आणले होते.या वेळी चेअरमन जितेंद्र पवार, व्हा.चेअरमन दिलीपसिंह भोसले सर्व संचालक तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी श्रीराम बझार येथे श्रद्धांजली वाहिली या वेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दुःखी होऊन जड अंतः करणाने शेवटचा निरोप दिला व त्या नंतर त्यांच्या मूळ गावी मठाचीवाडी येथे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
फोटो :- कै. जयराम राजमाने