फलटण :- पिकप गाडीमध्ये गाय व खोंड क्रूरतेने व दाटीवाटीने विनापरवाना गाडीत वाहतूक करताना एकास चार लाखाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली असून संबंधित व्यक्तीच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार, दि २३ रोजी ११ वाजताच्या सुमारास दरम्यान दगडी पूल शुक्रवार पेठ फलटण येथे सोहेल जलील कुरेशी राहणार कुरेशी नगर मंगळवार पेठ फलटण एमएच O11 एजी ३६२९ या पिकप गाडी मध्ये
आरोपी सोहेल जलील कुरेशी याने एक तांबड्या रंगाचे अंदाजे दीड वर्षाचे जर्सी जातीचे खोंड, एक पांढरे व तांबड्या रंगाचे अंदाजे दीड वर्षाचे जर्सी जातीचे खोंड तसेच एक पांढरे व तांबड्या रंगाचे अंदाजे दोन वर्ष वयाची गायी क्रूरतेने व दाटीवाटीने विनापरवाना भरून घेऊन जात असताना आढळून आल्याने एकूण ४ लाख ११ हजार इतक्या मुद्देमालासह आरोपी सोहेल जलील कुरेशी याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चंद्रकांत साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. ह गार्डी हे करीत आहे.