फलटण : मौजे फडतरवाडी गावातील लोकांनी सामाजीक बांधीलकी जपत फडतरवाडी गावातील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर्स व आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या परिसरातील सर्व घरांमध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीची कोरोना तसेच तत्सम आजाराविषयी माहिती गोळा करत आहेत. तसेच पुणे मुंबई वरून आलेल्या लोकांना अलगीकरण करणे, त्यांचे अहवाल तयार करून ते आरोग्य विभागास पाठवणे अशी कामे अतिशय प्रामाणिक पणे करत आहेत. आज या सर्वांच्या कामामुळेच आपले गाव कोरोना मुक्त आहे. हे त्यांचेच श्रेय म्हणावे लागेल.
गेली चार महिने अगदी प्रामाणिक पणे हे सर्वजण आपल्या गावातील लोकांना या कोरोन रोगाची बाधा होऊ नये म्हणून झटत आहेत. या सर्वांचे कौतुक व्हावे व सध्या पावसाच्या वातावरणामध्ये त्यांना त्रास होऊ नये म्हणून सचिन फडतरे यांच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांना छत्री चे वाटप करून त्याचा विश्वास वाढवण्याचे काम केले. फडतरवाडी चे ग्रामपंचायत सदस्य सचिन फडतरे यांनी केले .यावेळी जमलेल्या सर्वांनी आपले गाव यापुढे देखील कोरोना मुक्तच राहील असा निर्धार व्यक्त केला
याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक चंदरराव फडतरे, सरपंच श्री संतोष शेंडगे, मा उपसरपंच सौ रुपाली फडतरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील श्री शांताराम काळेल, ग्रामसेवक बी एम काळेल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ, चौगुले, धायगुडे मॅडम तसेच सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .