बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देसाई इस्टेट परिसरात दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना व रिक्षा चालकांना जीवनावश्यक किट चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी बारामती नगरपरिषद च्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे,जळोची ग्रामपंचायत चे माजी नगरसेवक छगन आटोळे,न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे,उद्योजक दीपक बनकर, पै प्रवीण माने,श्री गणेश तरुण मंडळ चे अध्यक्ष अनिल खंडाळे आदी मान्यवर उपस्तीत होते.”कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सोशल डिस्टन्स चे पालन करून गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे देसाई इस्टेट परिसरातील 400 गरीब कुटूंबाना प्रत्येकी एक किट वाटप करण्यात येणार आहे व
अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व विकास काम करताना दादांना अभिप्रेत असणारे काम करत राहू व चांगल्या कार्याची दखल पक्ष नेतृत्व व दादा नक्की घेणार आहेत टिके कडे दुर्लक्ष करत उत्कृष्ट कार्य करत रहा, पक्ष विरोधी कार्य करणाऱ्या कडे दुर्लक्ष करत रहा योग्य वेळी अजित दादा कार्याचे मूल्यमान करतील व कोणताही पदाची अपेक्षा न करता कार्य करतो तोच टिकतो
पदा साठी गटबाजी करणाऱ्यास पक्ष किंवा नागरिक माफ करित नाही असेही नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले.