मी पाहिलेले 'अजित' दादा

वक्तृत्व,नेतृत्व,आणि कर्तृत्ववा ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमहत्व म्हणजे अजित दादा होय.सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म एखाद्या कुटूंबात घेतल्यावरच कर्तृत्व दाखविता येते या पेक्षा स्वकर्तृत्व सिद्ध केल्यास समाज मान्य मोठे यश मिळत असते या वर विश्वास असणारे दादा होय.
जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील जन्म असताना सुद्धा उपमुख्यमंत्री पदा पर्यंत मजल मारताना धडपडनारा शेतकरी,शेतकऱ्यां मधील विविध प्रयोग करणारा उदोजक,कणखर राजकारणी,यशस्वी उपमुख्यमंत्री व आजही आपल्या काळ्या आईवर म्हणजेच शेतीवर प्रेम करणारे दादा होय.
खताळपट्टा येथे लहान पणा पासून दादा ना व त्याच्या कुटूंबियांना जवळून पाहण्याचा योग आला 1985 ते 1990 च्या आसपास दादा सर्व सामान्य शेतकऱ्यां प्रमाणे रोज शेतावर जाऊन शेती करणे,कुक्कुटपालन ,दूध डेअरी चालविणे हे व्यवसाय करताना मी पाहिले त्यानंतर बारामती परिसरात आईस्क्रीम कारखाना (थंड बर्फाचा गोळा किंवा कुल्फी सारखे) च्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. एक जुनी जीप ज्या जीप मध्ये समोर च्या बाजुला काच नव्हती त्यामुळे चालविताना हवा,धूळ सर्व सहन करीत दादा चालविताना मी पाहिले.
दरम्यान शरद पवार साहेब नेहमी मुबंई, दिल्ली च्या राजकारणात व्यस्त असल्याने बारामती तालुक्यातील अनेकांना विविध कामा साठी इतर मंडळी च्या संपर्कात जावे लागे किंवा त्यांची मनमानी चालत असे 
त्यामुळे आम्ही सर्वांनी अजित दादा नि बारामती चा हक्काचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश करावा व सर्व सामान्य जनतेला न्याय द्यावा  असा दादा कडे हट्ट धरला परंतु दादांना शेती प्रिय वाटे परंतु त्या परिस्थितीत ही खूप महत्त्वाची गरज असल्याने शरद पवार साहेबाना सुद्धा सांगून शेवटी अजित दादा यांचा  राजकारणात प्रवेश करून घेतला .  त्या नंतर दादांनी आपल्या कर्तृत्ववाने सर्व जगाला दाखवून दिले 
“की कोणताही निर्णय हा चुकीचा नसतो तर घेतलेला बरोबर आहे हे कर्तृत्ववाने सिद्ध करावे लागते “.
पवार साहेबां ची कोणतेही निवडणूक असताना बारामती तालुक्याची प्रचारा ची धुरा अजित दादा यांनी समर्थ पणे पेलली, प्रचाराची जास्त सेवा सुविधा नसताना कधी उघड्या जीप मधून तर कधी कार्यकर्ते समवेत  पायी  तालुक्यात प्रचार करून तालुक्यात काय कमी आहे याचा बारकाईने अभ्यास करून विविध मंत्री पदावर काम करताना बारामती चा चौफेर विकास केला.
एमआयडीसी मधील प्रत्येक उद्योजकाच्या उदघाटन वेळी दादा आवर्जून सांगतात “मी सुद्धा शेती केली व सद्या  करतोय,विविध व्यवसाय केले  पण चिकाटी असल्या शिवाय यश मिळत नाही त्यामुळे बँकेचे कर्ज लवकर फेडा व मन लावून व्यवसाय करा” 
दादा परखड व स्पष्ट बोलतात हे खरे आहे परंतु काम होणार असेल तर होणार व नसेल तर नाही म्हणून सांगणारे दादा कदाचित एकमेव नेते असतील कारण स्पष्ट बोलल्याने कार्यकर्ता दूर जाण्याची भीती असते परंतु त्याची तमा न बाळगता खरे बोलणारे दादा होय.
 विकास कामाच्या च्या बाबतीत  गुणवत्ता व दर्जा मध्ये दादा तडजोड करीत नाही,निसर्ग प्रेमी ,पर्यावरण वाढीस चालना देणारे दादा प्रसंगी कठोर होतात हे अनेक वेळा मी जवळून पाहिले आहे.
पिंपरी चिंचवड,बारामती सारखा विकास राज्यात आपणस करायचा आहे त्या साठी सर्वांनी आप आपल्या मतदार संघात वेळ द्या हे सुद्धा सहकारी आमदारांना दादा आवर्जून सांगतात.
उपमुख्यमंत्री च्या व्यस्त कार्यक्रमात जेव्हा बारामती मध्ये दादा असतात तेव्हा   काटेवाडी च्या शेतात पहाटे 5 ला दादा दिसतील व आठवड्यात काय काम झाले काय नाही व पुढील आठवड्यात काय करायचे याचे नियोजन करतात प्रसंगी एखादें काम सुद्धा स्वतः करतात 
प्रत्येक शेतकरी, उद्योजक आदी ना दादा सांगतात पुढील 20 ते 25 वर्षाचा विचार करून शेती,व्यवसाय,बांधकाम,मुलाचे शिक्षण आदी नियोजन करा हे सांगताना दादाची अनुभवाची दूरदृष्टी दिसून येते.
दादांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होणे साठी खंबीर साथ  व  दादाच्या अपेक्षेप्रमाणे तालुक्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरण करताना  खऱ्या अर्थाने दादाच्या सुविद्य पत्नी सौ सुनेत्रावहिनी यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.
 एके काळचा बिकट परिस्थिती मधील शेतकरी,पोल्ट्री ,डेअरी,आइस्क्रीम व विविध  व्यवसाय करणारा उद्योजक,यशस्वी राजकारणी म्हणून मी अजित दादा ना पाहिले आहे 
परंतु विषय गंभीर असतात तेव्हा दादा खंबीर असतात हे अनुभवलं आहे 
आशा आमच्या लाडक्या दादा ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
लेखक 
 श्री किशोर भापकर 
व्हाईस प्रेसिडेंट आय एस एम टी 
बारामती
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!