रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना शर्मिला पवार,सोबत सोमनाथ गायकवाड,दत्ता माने,घाडगे, काळे व इतर (छाया तानाजी माने)
बारामती: शुक्रवार 17 जुलै रोजी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित दादा युथ फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शरयु फौंडेशन चे अध्यक्ष शर्मिला पवार यांच्या हस्ते झाले .कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर होते या कार्यक्रमास प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे , तहसिलदार विजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर , ग्रामीण पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप , पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव
नगरसेवक जयसिंग देशमुख,सुधीर पानसरे,शारदा मोकाशी व सतीश कोकरे,प्रताप पागळे, आदी मान्यवर उपस्तीत होते. या वेळी सासवड चे नगरसेवक गणेश जगताप,भाजपा पदाधिकारी खंडू गावडे व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर गायकवाड आदी नि स्वतः रक्तदान केले. रक्तास कोणताही ,जात,धर्म,पक्ष नसतो त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे संकट असताना सुद्धा रक्तदान केले त्या मुळे
लॉकडाऊन च्या काळात 663 बाटल्या रक्त संकलित झाले झाले. 61 व्या वाढदिवसा निमित्त 661 झाडाचे वृषारोपन शहराच्या आसपास करणार असून पहिला टप्पा म्हणून 101 झाडे रुई मधील भैरवनाथ तरुण मंडळास सुपूर्द केल्याचे फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले. पदाधिकारी व रक्तदात्यांनी सोशल डिस्टंटस, मास्क व सॅनिटायजर चा वापर करीत सदर रक्तदान शिबिर संपन्न केले.