फलटण (प्रतिनिधी) :- पुर्वीच्या भांडणाचा राग व कोर्टात दाखल असले केसमध्ये कोर्टाने जामीन दिल्याचा राग मनात धरुन आठ जणांनी फडतरवाडी येथील एक जणांस तलवार,गज,कोयत्यांने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या बाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.18 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मौजे फडतरवाडी ता.फलटण जि.सातारा गावचे हददीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर गोरख फडतरे यांचे किराणा मालाचे दुकानाशेजारी पुर्वीचे भांडणाचे कारणावरुन कोर्टात दाखल असले केसमध्ये कोर्टाने जामीन दिल्याचा राग मनात धरुन रमेश पांडुरंग फडतरे वय 55 वर्षे, संजय पांडुरंग फडतरे वय 53 वर्षे, राजेंद्र पांडुरंग फडतरे वय 50 वर्षे, शैलेश रमेश फडतरे वय 32 वर्षे, गणेश रमेश फडतरे वय 30 वर्षे, आकाश संजय फडतरे वय 23 वर्षे, नागेश कैलास जाधव वय 30 वर्षे, कैलास बापुराव जाधव वय 55 वर्षे सर्व राहणार फडतरवाडी ता.फलटण जि.सातारा यांनी आपसात संगनमत करुन संतोष फडतरे हे मोटार सायकलवरुन शेताततुन घरी येत असताना त्यांना रोडवर वाहने आडवी लावून संतोष फडतरे यांना तलवारी , गज , कोयत्याने डोक्यात दोन्ही हातावर तसेच अंगावर वार करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वरील आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद बाळासो फडतरे राहणार फडतरवाडी यांनी दिली असून या गुन्ह्याचा तपास सा.पो.नि.नागटीळक करीत आहेत.