बैलांची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी एका जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फलटण :- सुरवडी ता.फलटण येथे एका गाडीत तीन बैलै पाय बांधलेली अवस्थेत वाहतूक करताना आढळल्या प्रकरणी एका जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार , दि.14 रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास मौजे सुरवडी ता.फलटण येथील शेतातून महेश संभाजी पवार हे घरी जाणेस लोणंद -सुरवडी डांबरी रोडने निघाले असता सुरवडी गावचे कमानीजवळ एक टमटम चार चाकी गाडी MH -50-8346 ही थांबलेली दिसली म्हणून महेश पवार यांना संशय आलेने ते तेथे थांबले असता त्यावेळी सुरज भोसले हा आला व तेथेच बाजुला रोडवर सदर गाडीतील हौदयात दोघांनी बघीतले असता याठिकाणी असलेल्या गाडीचे हौदयात तीन बैले दाटीवाटीने क्रुरतेने डांबून ठेवलेचे त्यांना दिसले.त्याबाबत महेश पवार यांनी गाडीवरील ड्रायव्हरला त्याचे नाव,गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संभाजी नथु रास्ते वय 50 वर्षे,रा.अर्बन बझार जवळ विदयानगर सैदापूर ता.कराड जि.सातारा असे सांगीतले. सदर बैलांबाबत विचारपूस केली असता बैलांबाबत काहीएक माहिती दिली नाही.
यावेळी गाडीत उभे शिंगी दोन बैले त्यांची वय अंदाजे 7 वर्ष,तसेच पांढरे रंगाचा एक बैल वय अंदाजे 10 वर्ष, क्रुरतेने पाय बांधलेली डांबून ठेवलेले भरलेले आढळून आली. संभाजी नथु रास्ते वय 50 वर्षे,रा.अर्बन बझार जवळ विदयानगर सैदापूर ता.कराड जि.सातारा याचेविरुद्ध महेश संभाजी पवार वय 28 वर्षे,व्यवसाय शेती,रा.सुरवडी ता.फलटण जि.सातारा यांनी कोणत्याही प्रकारे खरेदी विक्रीच्या पावत्या नसलेले,बेकायदेशीर जनावरे एका ठिकाणी पाय बांधलेले,क्रुरतेने डांबून ठेवून त्यांची चारापाणीची कोणतीही व्यवस्था,वैदयकीय व्यवस्था असे व्यवस्थापन केलेले नसल्याचे व वाहतुक करणेचे हेतूने वाहनात मर्यादेपेक्षा जादा भरलेले आढळून आल्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!