फलटण : सातारा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्याने फलटण शहरातील गरीब व गरजू कुटुंब, बेघर व्यक्ती व हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांची उपासमार होवू नये म्हणून हॉटेल ब्रम्हा यांचेवतीने अन्नछत्र उपक्रम सुरु करण्यात येणार असून अन्नछत्र उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन अभिजीत भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग सातारा जिल्ह्यातील विविध भागात वाढत असल्याने सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 17 जुलै 2020 ते 26 जुलै 2020 या काळात पुन्हा लॉकडाऊन आदेश निर्गमित केले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पुन्हा फलटण शहर परिसरात अन्नछत्र उपक्रम सुरु करण्यात येणार असून यापूर्वी झालेल्या लॉकडाऊन कालावधीत फलटण येेथील हॉटेल ब्रम्हा यांचेवतीने जवळपास 26 हजार लोकांना अन्नदान केले असल्याचे सांगण्यात आले.
आता घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये फलटण शहरातील गरीब व गरजू कुटुंब, बेघर व्यक्ती व हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांची उपासमार होवू नये म्हणून हॉटेल ब्रम्हा यांनी दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने पुन्हा अन्नछत्र उपक्रम सुरु केला असून गरीब व गरजू कुटुंब, बेघर व्यक्ती व हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांना जागेवर अन्न पोहोच करण्याचा मानस असल्याचे अभिजीत भोसले यांनी सांगितले.
अन्नदान उपक्रमासाठी फलटण शहर व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावे असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी हॉटेल ब्रम्हा अभिजित भोसले मोबाईल 9226253565 व दैनिक लोकमतचे पत्रकार नसीर शिकलगार मोबाईल 9860004730 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.