शहीद जवान उद्धव घनवट यांच्या कन्येचे इ.10 वी परिक्षेत सुयश

फलटण : उपवळे ता.फलटण गावचे सुपुत्र ’हुतात्मा उद्धव किसन घनवट’ यांची कन्या ’कु.स्नेहल उद्धव घनवट’ इयत्ता 10 वी.(सी.बी.एस.सी.) मध्ये 94.2% गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
हुतात्मा उद्धव किसन घनवट हे 14 मे 2008 रोजी कर्तव्य बजावत असताना दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले आणि ते देशसेवा करत असताना हुतात्मा झाले . तर 5 नोव्हेंबर 2018 रोजी स्नेहलच्या आईचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांना मरण आले. अशी दुर्दैवी, दुःखद प्रतिकुल वेळ कु.स्नेहलवर असताना देखील तिने शिक्षणात असणारी गुणवत्ता टिकवत आता इयत्ता 10वी. मध्ये 94.2% गुण मिळवले आहेत. 
कु.स्नेहल श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल या विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. 
स्नेहलच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन जयहिंद फौंडेशनच्यावतीने देण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!