गरम पाणी पिऊन व वाफ घेवून फलटणकरांनी आरोग्याची खबरदारी घ्यावी: श्रीमंत रघुनाथराजे

 फलटण : फलटण शहरात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत चालला आहे. त्याच्याशी आपण सर्वजण मिळून लढा देतच आहोत. फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण नगरपरिषद, सरकारी प्रशासन, पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.  ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबालकर यांच्या आदेशानुसार आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत सुभद्राराजे, श्रीमंत विश्‍वजीतराजे शहरावर व ग्रामीण भागावर लक्ष ठेवून आम्ही सारेच सतर्क आहोत. प्रत्येक नागरिकाने गरम पाणी पिणे व वाफ घेणे हा कोरोनावरील प्रतिबंधक उपाय अंमलात आणून आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. 
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले की, गरम पाणी पिणे व वाफ घेणे हा कोरोनावरील प्रतिबंधक उपाय फायदेशीर व सोपा आहे. कुकरच्या शिट्टीचे झाकण काढून रबरी ट्युब त्या ठिकाणी लावून कुकर मधील पाण्याची वाफ करुन घसा व श्‍वासाद्वारे नाकात घेणे हा उपाय घसा व नाकातील कोरोनाचे जंतू (विषाणू) मारण्यासाठी प्रत्येकाने करावा. अथवा मेडिकल दुकानातून वाफार्‍याचे भांडे आणून विक्सचा वाफारा घेतल्यास कोरोनापासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. जरी आपण नकळत एखाद्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलो तरी या उपाययोजनेमुळे आपण कोरोनाला आपल्याला होण्यापासून रोखू शकतो. 
सदरचे उपाय आम्ही सर्व जण करीत असून नागरिकांनीही सदर उपाय जरुर करावा. फलटण ही आपली रामनगरी आहे. संकट आले तरी नगरीचे संरक्षण करण्यास श्रीराम समर्थ आहेत. परंतू आपण स्वत: शिस्त पाळून प्रशासनास सहकार्य करावे व वाफारा व गरम पाणी जरुर घ्यावे असेही आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांनी नागरिकांना केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!