बारामती वृत्तसेवा : बारामती परिसरा मध्ये सामाजिक बांधिलकी जपत असताना पर्यावरण रक्षण व वाढीसाठी श्रायबर डायनॅमिक्स डेअरी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कंपनीचे प्लांट हेड जितेंद्र जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 61 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने हरित व सुंदर एमआयडीसी अभियान राबवत असून वनविभाग व उद्योजकांच्या सहभागाने किमान 1000 झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. या आवाहनास प्रतिसाद देत एमआयडीसी मधील श्रायबर डायनॅमिक्स डेअरी यांनी कंपनी परिसरात श्री जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि 16 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेश्याम सोनार, सदस्य मनोहर गावडे, ऍड अमीर शेख , संभाजी माने, हरीश कुंभारकर, राजेंद्र खैरे, अभिजीत शिंदे, शार्दूल सोनार तसेच कंपनीचे अधिकारी उपस्तीत होते.
फोटो ओळ: वृषारोपन करताना जितेंद्र जाधव व इतर मान्यवर (छाया अनिल सावळेपाटील)