बारामती: महावितरण च्या गलथान कारभारा मुळे रुई मध्ये काही घरावरून वीज वाहक तारा लोंबकळत आहेत या संदर्भात वारंवार महावितरण कंपनीस निदर्शनात आणून दिले तरीही दुर्लक्ष केल्याने आता पर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला त्यामुळे त्वरित सदर तारा काढून टाकाव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नगरसेविका सुरेखा पांडुरंग चौधर यांनी महावितरण कंपनीस दिला आहे. याच आठवठ्यात रुई मध्ये विजवाहक तारा ना चिटकवून एका 17 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला त्यानंतर रुई मधील ग्रामस्थ व स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर यांनी महावितरण चे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या कडे सदर तारा त्वरित काढण्या साठी निवेदन दिले आहे. “या पूर्वी महावितरण कंपनीस वारंवार तारा काढण्यास सांगितले परंतु वेळ काढू पणा व अक्षम्य दुर्लक्ष केल्याने आता पर्यंत अपघात झाले आहे जर या आठवड्यात तारा काढल्या नाही तर तीव्र आंदोलन करू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे सुद्धा तक्रार करणार असल्याचे सुरेखा चौधर यांनी सांगितले.या प्रसंगी पांडुरंग चौधर,गोरख चौधर,विकी चौधर,विशाल जगताप,नितीन पानसरे,लक्ष्मण चौधर,प्रशांत चौधर,अजय चौधर आदी उपस्तीत होते.