आज फलटण येथे ७ कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली

*फलटण टुडे, वृत्तसेवा*

१. मौजे सरडे येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या (वडील) निकट संपर्कातील ७ वर्षांची मुलगी व ४ वर्षांचा मुलगा यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे.
*( High Risk contact )*
२. मौजे साखरवाडी येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३३ व ५२ वर्षीय महिला तसेच १८ वर्षीय मुलगी व १४ वर्षीय मुलगा यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे
*(High Risk Contacts)*
३. मौजे बुधवार पेठ, फलटण येथील ५७ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. सदर महिलेचा स्वॅब घेतल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल असताना मृत्यू झाला आहे.
*( SARI + Travel History )*
एकूण ७ पाॅसिटीव्ह
निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, असे उपविभागीय अधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!