फलटण : फलटण तालुक्यातील आसू येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३० वर्षीय पुरुषाची कोरोनाची चाचणी पाॅसिटीव्ह आलेली आहे. कळबोली येथून उपळवे ता. फलटण येथे प्रवास करून आलेल्या व पूर्वी सारी हा आजार असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाची कोरोनाची चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. काल (दिनांक १३ जुलै) रोजी एकूण ३ पाॅसिटीव्ह रुग्ण फलटण उपविभागात आढळले आहेत. सर्व पॉसिटीव्ह आलेल्या रुग्णांचे निकट संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
फलटण तालुक्यात कोरोनाचा कहर रोज रुग्ण संख्येत होतेय वाढ
फलटण तालुक्यामध्ये काल (दिनांक १३ जुलै) रोजी 2106 व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील कोरोना केअर सेंटरच्या कन्फर्म वार्ड मध्ये 23 रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड 66 जण आहेत व फलटण येथे संस्थामक विलीगीकरण कक्षात कोणीही नाही. त्या सोबतच काही कोरोना चाचण्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचेही उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.