आसू (आनंद पवार )- फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभागाने कोरणा व्यक्तीच्या संपर्कातील व 17 जणांना कोरंटाईन केले तर नऊ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले आहे आसू तालुका फलटण येथील 22 वर्षीय महिलेला कोरोनाची व सारी ची लक्षणे आढळून आली असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे उपविभागीय दंडाधिकारी शिवाजीराव जगताप यांनी घोषित केले. प्रशासकीय यंत्रणेने तो भाग त्या वस्तीत पुरताच सील केला असून आसू गावात पान टपरीवर टपरी वजा किराणा दुकाने आदेश असतानाही उघडेच आहेत सायंकाळी पानपट्टी व मोजकी किराणा दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे शासनाने नवीन कमिटी तयार केली असून त्या कमिटीमध्ये प्रशासकीय यंत्रणेतील मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक व पोलीस पाटील तसेच बीट अंमलदार यांचा समावेश असून ही कमिटी फक्त कागदावरच पाहायला मिळत आहे आसू ग्रामपंचायतीचे कोरणा दक्षता कमिटी चे काम महत्त्वपूर्ण आहे व त्यांच्या कामाची पद्धती खूपच चांगले आहे आसू ग्रामपंचायतीच्या दक्षता कमिटीने संबंधित भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण याची फवारणी करून त्या कमी त्यातील सदस्यांनी बॅरिकेट्स लावले आहेत ते सदस्य व गावचे सरपंच गावातील नागरिकांना विविध सूचना करता असून गावात कोरोना चा रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे