बारामती: रविवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यावर येणाऱ्या 25 जणांचा अहवाल काय येतो या कडे लक्ष होते परंतु 25 पैकी 9 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत तर 16 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
म्हणजेच रविवार दिनांक 12 जुलै रोजी सांयकाळी 4 वाजून 30 मिनिट पर्यंत बारामती मध्ये 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे.
बारामती मध्ये अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत,सोशल डिस्टन्स चे पालन करीत नाही बाजारपेठ,व्यवहार मध्ये कोठेही शासनाची नियमावली वापरली जात नाही त्यामुळे काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केली आहे.