फलटण – येथील नगरपालिकेतील महिला कर्मचारी यांना वारंवार त्रास देणा-या नगर परिषदेतील लिपीक विजय रमेश मारुडा याचेवर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मधून मिळालेली माहिती अशी की, फलटण नगर परिषद येथील काम करणाऱ्या पीडित महिला वय 38 वर्षे महिला यांना फलटण नगर परिषदेच्या लिपीक पदावर काम करणाऱ्या विजय मारुडा यांनी दि. ३१ मे २०२० ते १० जून २०२० रोजीच्या दरम्यान आरोपी विजय मारुडा याने पीडित महिलेच्या ऑफिस मध्ये येऊन मोबाईल घेऊन त्याचे ऑफिसमध्ये गेला यानंतर पीडित महिला यांनी ऑफिसमध्ये जाऊन मोबाईल दे असे म्हणाले असता तू कोणाशी बोलते कोणाशी चॅटिंग करते ते मला बगायचे आहे असे म्हणून वाईट हेतूने उजवा हात धरून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून पीडित महिलेस हाताने मारहाण व शिवीगाळ केली यानंतर पीडित महिलेने फलटण शहर पोलीस ठाण्यात लिपिक विजय मारुडा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.