फलटण : निंबळक ता. फलटण येथील शुक्रवारी राञी बिबट्याने काशिराम मोरे यांच्या घरालगत असलेला पाळीव कुञा उचलुन नेला. निंबळक भागात गेली दोन महिने बिबट्याचा वावर असल्याचे छायाचिञासह स्पष्ट झाले आहे. आता तर बिबट्या निर्रढावलेला असुन घरासमोरच येत असुन पाळीव कुत्रा फस्त केला असून मोरे यांच्या घरा लगतच भला मोठा पाळीव कुञा नेला. किती दिवस ग्रामस्थ भिती पोटी जगणार वनविभागाने या बाबत काय तो एकदा साक्ष मोक्ष लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. वनविभागाकडून आता कानाडोळा केला जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.