सातारा दि. 11 (जि. मा. का) : आरोग्य विभागाकडून काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 41, सारीचे 2 आणि प्रवास करुन आलेले 3 असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
कराड तालूक्यातील मलकापूर येथील 54 व 47 वर्षीय महिला, वाण्याचीवाडी येथील 62 वर्षीय महिला, बनपूरी कॉलनी येथील 53 वर्षीय पुरुष,धावरवाडी येथील 8 वर्षाचा बालक, यादववाडी येथील 43 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील निमसोड येथील 33 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालक, बनपूरी येथील 38 वर्षीय पुरुष, वडूज येथील 34 वर्षीय पुरुष, निढळ येथील 18 वर्षीय तरुण.
वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील जिहे येथील 19 वर्षीय तरुण, 70 वर्षीय महिला, करंडी येथील 70,65 व 45 वर्षीय महिला, राधीका रोड येथील 39.27,31 व 48 वर्षीय महिला, करंजे येथील 45,25,23 व 56 वर्षीय महिला, भरतगाव येथील 77,15,व 51 वर्षीय पुरुष, 74,45 व 44 वर्षीय महिला,बोरगाव येथील 12 वर्षाचा बालक, 44 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, गार्डन सिटी येथील 31 वर्षीय पुरुष.
जावली तालुक्यातील सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पूनवडी येथील 67 वर्षीय पुरुष,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 7 वर्षाचे बालक, 42,65,35 वर्षीय महिला, शिंदेफाटा शिरवळ येथील 25 वर्षीय पुरुष, उमाजीनाईक शिरवळ येथील 14 वर्षाचे बालक,
महाबळेश्वर येथील 45 वर्षीय पुरुष,
पाटण तालुक्यातील निगोडे (उमरकांचन) येथील 57 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला.
घेतलेले एकुण नमुने17133
एकूण बाधित 1601
घरी सोडण्यात आलेले 950
मृत्यु 65
उपचारार्थ रुग्ण 586