संस्कृती प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकाने लॉकडाऊन काळात केली अनेक सामाजिक कार्ये

फलटण : फलटण मधील पहिले पारंपरिक ढोल-ताशा पथक म्हणून नावारूपास आलेले संस्कृती प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक. फक्त संगीताची , कलेची आवड या बरोबरच सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून , पथकाची आत्ता पर्यंतची यशस्वी वाटचाल चालू आहे .
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे ध्येय समोर ठेवून , समाजहिताचे भान ठेवून आपली सामाजिक बांधिलकी जपत , लॉकडाऊन काळात संस्कृती पथका तर्फे गरजू व्यक्तींना एकवेळ जेवणाची सोय करण्यात आली व काही गरजू व्यक्तींना संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तू व किराणा सामान उपलब्ध करून देण्यात आला .
तसेच लॉकडाऊन काळात भटक्या जनावरांना चाऱ्याची उपलब्धता करून देण्यात आली . त्याचबरोबरच पर्यावरणाची काळजी घेत पर्यावरण पूरक असे वृक्षारोपण पथका तर्फे वारुगड येथे १०० झाडे लवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य केले व गडावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांमुळे गडावर कचरा निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण होते त्यामुळे पथकातर्फे गडाची साफसफाई चे काम हाथी घेऊन , कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आले . आणि गडाची साफसफाई करण्यात आली .
दरवर्षी पथका तर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!