बारामती: शनिवार दी.11 जून 2020 रोजी बारामती शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे वाढती रुग्ण संख्या मुळे चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.
वसंतनगर, जळोची आणि पानगल्ली येथे हे रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी जळोचीतील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबातील सर्वांचीच तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या कुटुंबातील एका १५ वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे शहरातील पानगल्ली येथील एका पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. तर वसंतनगर येथे वास्तव्यास असलेल्या एका रुग्णसेविकेलाही कोरोनाची बाधा झाल्याचे डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.
मागील काही दिवसात बारामती शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात कोरोनाबाबत म्हणावे इतके गांभीर्य नागरीकांमध्ये दिसत नाही. त्यातूनच शहरात गर्दी वाढताना दिसत आहे. त्यातच बारामतीतील बाजारपेठ खुली झाल्याने आसपासच्या तालुक्यातील गर्दीही शहरात वाढत आहे. त्यातून सोशल डिस्टन्सींगचाही फज्जा उडत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करुन गर्दीवर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुन्हा लॉक डाऊन करावे अशी मागणी काही नागरिक करीत आहे.