आसू – आसू येथील तरुण मोशीम काझी याने आपल्या वाढदिवसानिमित्त मित्रांच्या मदतीने आसू गावातील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांना मास्कचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
कोरोनामुळे जग संकटात सापडले आहे तसेच आपणही सर्वजण संकटात सापडला आहे या संकटावर मात करण्यासाठी मास्क सॅनिटायझर यासारख्या गोष्टींचा वापर करावा लागत आहे तरी आपण या समाजात राहत असून या समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून आपल्या वाढदिवसाला साठी लागणारा अनावश्यक खर्च टाळून स्वयंसेवकांना तसेच ग्रामस्थांना मास्कचे वाटप केले.
हा मास्क वाटपाचा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले. यावेळी सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रमोद झांबरे, आसू ग्रामपंचायतीचे सरपंच महादेवराव सकुंडे ग्रा.सदस्य जीवन पवार,धनराज घोरपडे, मुन्ना शिरतोडे तसेच राहुल कुंभार, हर्षल डोंबाळे, सागर गोफने,महंमद मुलानी,आरिफ महात, असिफ महात,तोशिफ जकाते,आसिफ शेख आदी उपस्थित होते.