बारामती: बारामती एमआयडीसी येथील सौ.रोहिणी अनंत खरसे यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत बारामती तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणेत आली. सदरची नियुक्ती पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांचे हस्ते नियुक्ति पत्र देऊन करणेत आली. त्यावेळी संघटनेचे मार्फत पोलीस व नागरिक यांना मदत करून संघटनेची प्रतिमा जनसामान्यांमध्ये उज्वल करून संघटना मोठ्या प्रमाणावर मजबूत करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार आहे असे मत सौ.रोहिणी अनंत खरसे यांनी व्यक्त केले. रोहिणी खरसे यांनी या पूर्वी सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध पदावर काम केले आहे “महिलांना न्याय देत असताना पोलीस व पीडित महिला यांच्या मध्ये दुवा म्हणून काम करून न्याय देण्यासाठी पोलीस मित्र संघटना च्या मार्फत उत्कृष्ट काम करू ” असे निवडी नंतर रोहिणी खरसे यांनी सांगितले.