एमआयडीसी मधील रेड बर्ड एव्हीएशन चे बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी उपोषण चा इशारा

बारामती: बारामती एमआयडीसी मधील बारामती एअरपार्ट च्या हद्दीतील ‘रेड बर्ड एव्हीएशन’  लिमिटेड या विमान प्रशिक्षण क्षेत्रातील कंपनीने एमआयडीसी कार्यालयाकडे कोट्यवधी रुपयांचा  सर्व्हिस चार्ज  एमआयडीसी न भरता,कोणत्याही प्रकारचा’ ना हरकत दाखला ‘न घेता परस्पर बांधकाम पूर्ण  केले  त्यामुळे एक तर सर्व्हिस चार्ज भरून घ्या किंवा बेकायदेशीर बांधकाम उध्वस्त करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा रिपलब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने देण्यात आला आहे.
सोमवार दि.5 जुलै रोजी एमआयडीसी कार्यालय  बारामती चे उपअभियंता स्वप्नील पाटील यांच्या कडे निवेदन देऊन उपोषण चा इशारा देण्यात आला आहे.बारामती एअरपोर्ट लिमिटेड च्या परिसरात रेड बर्ड एव्हीएशन या कंपनीचे नियमबाह्य काम चालू आहे 458 एकरावरील कोट्यवधी रुपयांचा सर्व्हिस चार्ज शासना कडे न भरता काम चालू केले आहे. त्यांना परवानगी कोणी दिली? त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? इतर उद्योजक कंपनी सुरू करताना सर्व प्रकारची कर भरून घेतले जातात त्या नंतर ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते त्यानंतर बांधकाम पूर्ण केले जाते मग हा भेदभाव का केला  जात आहे . त्या कंपनीवर  फौंजदारी खटला भरावा अन्यथा उपोषण केले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रसंगी रिपलब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे,रोहित सोनवणे शहर उपाध्यक्ष , संजय वाघमारे तालुका सरचिटणीस रत्नप्रभा साबळे पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्ष रोहित सोनवणे उपाध्यक्ष शहर निलेश जाधव शहर सं पर्क प्रमुख उमेश शिंदे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पुनम घाडगे महिला शहराध्यक्ष रजनी साळवे शहर सरचिटणीस उमेश दुबे पत्रकार पुष्पराज मोरे, धनंजय शिंदे
 *कारवाई करणार: पाटील* 
 बेकायदेशीर बांधकाम व सर्व्हिस टॅक्स न भरल्या प्रकरणी त्या संस्थेस दोन नोटीस दिल्या आहेत आता तिसरे नोटीस देऊन फोजदारी कारवाई सुरू करणार आहोत अशी माहिती एमआयडीसी चे  उपअभियंता स्वप्नील पाटील यांनी दिली
 आमच्या संस्थेला बारामती एमआयडीसी कार्यालयाकडून अद्याप एकही नोटीस मिळाली नाही अशी माहिती रेड बर्ड एविएशन विमान प्रशिक्षण संस्था चे व्यवस्थापक सेवीयर विनसेंट यांनी दिली
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!