बारामती: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी आता आपल्या राज्याला दीर्घकाळ लॉकडाऊन ठेवण आपल्या राज्याला आर्थिक दृष्टीने परवडणार नाहीये.
गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगीन अगेन ची घोषणा केली होती.त्यामध्ये काही अटी व शर्थीसह राज्यातील उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी दिली होती.
त्याच धर्तीवर आता राज्यात हॉटेल्स आणि लॉज ८ जुलै पासून सुरू करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकार ने घेतला आहे.गेल्या १०० पेक्षा जास्त दिवसांपासून ही हॉटेल्स बंद आहेत.परंतु आता ग्राहकांच्या ३३% क्षमतेने ही हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.दरम्यान कंटेन्मेंट झोन ला यातून वगळण्यात आले आहे.सध्या कंटेन्मेंट झोन मध्ये हॉटेल्स आणि लॉज बंदच राहणार आहेत.