फलटण – राजाळे मारुती मंदिर ता फलटण जिल्हा सातारा येथे मा मारुती मोहिते सरपंच राजाळे , मा मल्हारी नाळे कृषि पर्यवेक्षक बरड ,श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक , मा संभाजी निंबाळकर माजी सरपंच , मा अशोक जगताप माजी सरपंच राजाळे , मा महेश शेडगे पोलीस पाटील , राजेंद्र निंबाळकर तंटा मुक्त अध्यक्ष , राजाळे,मा सुरेश निंबाळकर प्रगतशील शेतकरी , मा जयवंतराव निंबाळकर प्रगतशील शेतकरी , श्री शिवाजी बनकर,शंकर माने , नितीन शेडगे, दत्तात्रय निंबाळकर, शिवाजी शिंदे, कमलाकर भोईटे कृषि मित्र यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला
श्री रामचंद शिंदे यांच्या मका पीक प्लॉट भेट व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण व क्रोपसेप अंतर्गत मोबाईल कीड रोग सर्वेक्षण बाबत श्री मल्हारी नाळे , कृषि पर्यवेक्षक व श्री सचिन जाधव कृषि सहायक माहिती दिली
मका पिकांवरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण माहीती पत्रक वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
प्राथमिक स्वरूपात icici फाउंडेशन मार्फत १० शेतकऱ्यांना परसबाग अंतर्गत भाजीपाला बियाणे सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी व तयार करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वाटप केले
कृषि विभाग मार्फत रबविण्यात आलेल्या हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण कार्यक्रम मध्ये सहभागी श्री विजय इंगळे यांच्या हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण प्रकाश सापळा भेट प्रसंगी श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक यांनी हुमणी कीड जीवनक्रम व भुंगे नष्ट झाल्याने हुमणी कीड नियंत्रण मुळे होणारे फायदे बाबत माहीती दिली
श्री विजय इंगळे यांच्या mregs अंतर्गत नाडेफ व गांडूळ खत युनिट प्रक्षेत्र भेट वेळी श्री मल्हार नाळेकृषि पर्यवेक्षक यांनी mregs योजने बाबत सविस्तरपणे माहिती दिली
श्री जयवंतराव निंबाळकर, यांच्या घनलागवड पेरू भेट प्रसंगी पेरू लागवड फायदेशीर फळपीक असून आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यास मदत होणार असल्याचे यावेळी श्री जयवंत निंबाळकर यांनी सांगितले यावेळी शेतकऱयांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यावेळी दिले
मा.मारुती मोहिते सरपंच यांनी कृषि विभागा मार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम नाविन्यपूर्ण असून शेतकऱ्यांच्या फायदेशीर असल्याचे आणि कृषी विभागाचे कार्य राजाळे गावात उत्कृष्ट आहे अशी प्रतिक्रिया कृषि संजिवनी सप्ताह बांधावर प्रक्षेत्र भेट प्रसंगी मारुती मोहिते सरपंच राजाळे यांनी सांगितले
कार्यक्रमा चे आभार श्री कमलाकर भोईटे कृषि मित्र राजाळे यांनी मानले केले
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!