फलटण :महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत संपूर्ण राज्यात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषि दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी राज्यावर असलेल्या कोरोना संकटामुळे जास्त लोक एकत्रित येण्यावर मर्यादा असल्याने दि 1 ते 7 जुलै दरम्यान कृषि संजीवनी सप्ताह साजरा करून त्याअंतर्गत राज्यातील प्रत्येक गावात कृषि विभागाच्या वतीने सुधारित कृषि तंत्रज्ञान प्रसार केला जात आहे. त्याअनुषंगाने काल .दिनांक 4 जुलै 2020 रोजी जावली तालुक्यातील मौजे गवडी येथेमहाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ सातारा समिति ,जावली व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी श्री झेंडे साहेब विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्या पुणे , तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख साहेब मंडल कृषी अधिकारी संजय घोरपडे साहेब श्री अजय काळेसाहेब उप व्यवस्थापक , श्री. श्रीकांत ढवळ साहेब श्री अमरसिंह निंबाळकर सहाय्यक व्यवस्थापक MAIDC, पंचायत समिती कृषि विभागाच्या श्रीमती हेमलता येवले मॅडम ,गवडी गावचे सरपंच श्री तुकाराम जांभळे कृषी सहाय्यक विलास कदम तसेच गावातील युवा शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी श्री झेंडे साहेब यांनी भात लागवडीच्या विविध पद्धती, पावर टिलर याबद्दल माहिती दिली MAIDC मार्फत उत्पादित होणाऱ्या व विक्री केल्या जाणाऱ्या जैविक/रासायनिक खते कीटकनाशके यांची माहिती/वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन करण्यात आले. . कृषी खात्याच्या यांत्रिकीकरणाच्या वेगवेगळ्या योजना लाभ घ्याव असे अवाहन श्री देशमुख साहेब यांनी केले तसेच तसेच युरिया ब्रिकेटचा वापर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करावा व लवकरच युरिया ब्रिकेट कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. भातावरील खोड किडा नियंत्रण, जैविक कीड नियंत्रण याची माहिती दिली. भात पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात युरिया डी ए पी ब्रिकेट च्या वापराचे महत्व सांगून शेतकऱ्यांनी भात पिकात गुंठ्याला 2 कि. ब्रिकेट वापराव्यात असे आवाहन मंडळ कृषि अधिकारी श्री घोरपडे यांनी केले.श्रीमती येवले मॅडम ,यांनी पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध योजना व सोयाबीन बियाणे अनुदान योजना याबद्दल माहिती सांगितली .