गोखळी (प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .ना.बच्छु कडु यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून “पाच लाख वृक्ष लागवड “करण्याचा संकल्प करण्यात आला या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवते व सातारा व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री शंभूराजे खलाटे , सत्यजित गायकवाड गोखळी ग्रामपंचायत सरपंच सौ सुमन ताई गावडे. खटकेवस्ती ग्रामपंचायत सरपंच बापूराव गावडे. जि प सदस्य विश्वास दादा गावडे. ज्ञानदेव बापू गावडे. तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तात्या गावडे. गोखळी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन तानाजी बापू गावडे. भाजप नेते बजरंग गावडे.माजी सरपंच नंदू मामा गावडे. रमेश दादा गावडे. उपसरपंच बाळासाहेब आटोळे. उपसरपंच योगेश गावडे पाटील. ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गावडे पाटील. शांताराम गावडे. अभिजित जगताप. पत्रकार राजेंद्र भागवत. ग्राम विस्तार अधिकारी गणेश दडस. तलाठी गायकवाडअण्णा. कृषी सहाय्यक सौ दीपा मुळीक व नाळे साहेब. पिंटू जगताप. ज्ञानेश्वर घाडगे. व तरुण युवक उपस्थित होते.
यावेळी शंभूराज खलाटे बोलताना म्हणाले प्रहार जनशक्ती पक्ष राजकारण विरहित काम करणारा पक्ष आहे. अपंगाच्या प्रशांसाठी ना.बच्छु कडू यांनी संघर्ष करून न्याय मिळवून दिला आज ग्रामपंचायत स्तरापासून राज्यस्तरावर आर्थिक बजेट मध्ये तरतूद करण्यास शासनास भाग पाडले शेतकरी केंद्र बिंदू माणून शेतीमालाला रास्त दर मिळवून देण्यासाठी जनशक्ती प्रहार पक्ष ना.बच्छु कडू यांचे नेतृत्वाखाली प्रयत्नशिल आहे . यावेळी तानाजी बापू गावडे . मनोज तात्या गावडे.पै. बजरंग गावडे. यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते व सातारा व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शंभूराजे खलाटे यांनी चि. सागर गावडे (पाटील) यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती पत्र दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य श्री राधेश्याम जाधव यांनी केले. व गोखळी ग्राम विस्तार अधिकारी श्री गणेश दडस यांनी आभार मानले.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!