कोळकी येथील एकास सुमारे 14 लाख रुपयाचा ऑनलाइन गंडा

 फलटण : फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रेय दिनकर दडस वय 40 वर्ष धंदा नोकरी राहणार फ्लॅट नंबर 303 बी स्वप्नपूर्ती अपार्टमेंट कोळकी,फलटण यांना दिनांक 28 जून 2020 सकाळी 10.00 वाजले पासून ते दिनांक 01 जुलै 2020 रोजी  दुपारी 4.00 वा चे दरम्यान  फिर्यादी  त्यांचे राहते घरी  फ्लॅट नंबर  303 बी विंग  स्वप्नपूर्ती अपार्टमेंट  कोळकी फलटण  जिल्हा सातारा येथे  असताना,  मोबाइल वापरणारे  इसम नामे  अभिषेक शर्मा, केपी सिन्हा,  राविकुमार अशी नावे धारण केलेल्या  अज्ञात इसमांनी दडस यांना वेळोवेळी फोन करून त्यांचा विश्वास  संपादन करून,   पेएटीएम अँप ची केवायसी  व्हेरिफिकेशन करून देतो  असे म्हणाले. व दडस यांच्या मोबाईलचा  क्विक सपोर्ट  ॲप द्वारे  एक्सेस मिळवून त्यांच्या  क्रेडिट कार्ड व  डेबिट कार्ड च्या माहितीचा  वापर करून, एल.आय.सी., एच. डी. एफ. सी.,  आय. सी.आय.सी. आय.  बँकेच्या  क्रेडिट कार्ड मधून  व आय. सी. आय. सी. आय. बँकेचा अकाउंट मधून  एकूण 38 ट्रांजेक्शन  द्वारे  एकूण 13,98271 /-रुपये दडस यांच्या  संमतीविना  काढून घेऊन  त्यांचू फसवणूक केली आहे असल्याची फिर्याद दत्तात्रय दिनकर दडस यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक  प्रताप पोमन हे करीत आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!