फलटण मध्ये कृषी पदवीधर संघटने मार्फत तहसीलदार यांना निवेदन दिले

फलटण : राज्यात विविध ठिकाणी चढ्या भावाने बी-बियाणे व खते यांची मोठ्या प्रमाणावराती विक्री चालू आहे. सध्या हे सुरू असलेले लॉकडाऊन व त्यामुळे शेतीत झालेले नुकसान आणि आता त्या मधेच ह्या खतांची व बियानेंची जास्त भाव आकरल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या तक्रारी नुसार कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष कृषिभूषण श्री.महेश कडुस पाटील यांनी महाराष्ट्रामधील तमाम संघटनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना आवाहन केले त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रकाश यादव, सातारा अध्यक्ष नितीन निंबाळकर यांनी ह्या विषयास हाथ घातला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका तहसीलदार यांना आपल्या कृषी पदवीधर संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले. त्यात तहसीलदार यांनी स्वतः तालुका स्तरावरती एक वेगळी समिती नेमून अश्या चढ्या भावाने खतांची व बियाण्याची विक्री करणाऱ्या दुकानावराती छापे घालून त्यांच्या वरती कार्यवाही करावी अशी मुख्य मागणी केली आहे. ह्या विषयावरती आपण नक्की लक्ष केंद्रित करून नक्की ह्या समस्या सोडवू असे आश्वासन ही तहसीलदार आर.सी.पाटील साहेब यांनी दिले  हे निवेदन कृषी पदवीधर संघटनाह्यांच्या मार्फत दिले गेले, त्या वेळी तिथे फलटण तालुका तालुकाध्यक्ष ओंकार गोडसे, कार्याध्यक्ष- सूरज जाधव,प्रतीक मसुगडे, शहराध्यक्ष- अनिकेत पिसाळ, उपाध्यक्ष- वरद कापसे, हर्षद फडतरे, प्रशांत शिर्टोडे, सचिव – वैभव फडतरे,अनिकेत काकडे, अंकुश गटकुल,समीर नाळे,तसेच विद्यार्थी संघटक निखिल माळवे, सुयश शिंदे, चिराग चौधरी,कुणाल अब्दगीरे ई. उपस्थितीत होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!