सातारा दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात विविध रुग्णालयात व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून कोरोनातून बऱ्या झालेल्या 22 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष, नायगाव येथील 40 वर्षीय महिला, वय 14 व 15 वर्षीय युवती, करंजखोप येथील 40 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवक, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 39 वर्षीय महिला.,
कराड तालुक्यातील वडगांव येथील वय 20 व 44 वर्षीय महिला, तारुख येथील 24 वर्षीय पुरुष,
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला. बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.,
फलटण तालुक्यातील शेऱ्याचीवाडी आनंदगाव येथील 38 वर्षीय महिला, शेरेवाडी (हिंगणगाव) येथील वय 61 व 32 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, फलटण शहरातील रविवार पेठेतील 3 वर्षीय बालक.,
खंडाळा तालुक्यातील झगलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,
वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील वाढे फाटा येथील 65 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
358 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 32, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 41, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 64, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथून 6, ग्रामीण रुग्णालय वाई येथून 11, शिरवळ येथून 39, रायगाव येथे 38, पानमळेवाडी येथून 40, मायणी येथून 11, महाबळेश्वर येथून 3, पाटण येथून 9, दहिवडी येथून 40, खावली येथून 24 अशा एकूण 358 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
*घेतलेले एकुण नमुने* |
14330 |
*एकूण बाधित* |
1188 |
*घरी सोडण्यात आलेले* |
779 |
*मृत्यु* |
49 |
*उपचारार्थ रुग्ण* |
360 |