वाचनसाखळी समूहाकडून गणेश तांबे यांचा गौरव-

 

फलटण :   माहे जून- 2020 या महिन्यातील सर्वात जास्त 27 पुस्तक वाचून समीक्षण केल्याबद्दल,आज  गणेश तांबे यांचा वाचनसाखळी समूहाकडून गौरव करण्यात आलाआहे. गणेश तांबे प्राथमिक शिक्षक असून ते नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. वाचन साखळी बद्दल गणेश तांबे म्हणाले की,1 मे 2020 पासून सुरु केलेला वाचनसाखळी हा उपक्रम सदस्य संख्या 2300 वर गेली आहे.

वाचन साखळी हा उपक्रम  खरोखरच एक आगळा-वेगळा असा फेसबुक वरिल उपक्रम आदरणीय प्रतिभाताई लोखंडे व प्रतिभा टेमकर मॅडम यांच्या कल्पनेतून सुचलेला असा हा आगळावेगळा उपक्रम. दोघी शिक्षिका ,दोघींच्या नावातच प्रतिभा हा शब्द खराखुरा प्रतिभावंत वाटतो, महिलांनी मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं हे उत्तम एक प्रेरणादायी उदाहरण आपणास डोळ्यासमोर दिसून येते.आणि खरोखरच वाचन साखळी महाराष्ट्राच्या  काना-कोपर्‍यातच नव्हे तर इतर ठिकाणीही अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीला उतरलेला हा एक आगळा वेगळा उपक्रम .दोन्ही महिला भगिनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे करावं तितकं कौतुक कमीच आहे.
         कारण आपल्या कौटुंबिक कामातून अशा या उपक्रमासाठी वेळ देणे तसेच आलेल्या प्रत्येक पुस्तक परीक्षनाचे वाचन करून त्या लिखाणाला  प्रतिसाद देणे, प्रोत्साहन देणे हे अतिशय चांगलं काम ते मनापासून करत आहेत.
पुस्तक वाचण्याने  मस्तक सुधारते, सुधारलेलं मस्तक कोणाचं हस्तक तर होतच नाही पण लाचारीने कोणापुढे नतमस्तक होत नाही.
 पुस्तकाची संगतच खरी वाढवते आयुष्याची रंगत. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले संस्कार, चांगले विचार पुस्तकातून मिळत असतात.      
 प्रत्येकाच्या घराघरात ग्रंथालय हीच देवालय व्हावेत आणि ग्रंथ हेच देव.
         नव्या पिढीच्या नावे बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा त्यांना संस्काराच्या ठेवी देणाऱ्या पुस्तकांच्या बँका उभारणं ही आज काळाची गरज आहे.
वाचनसाखळी  या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून नवनवीन पुस्तकांची माहिती मिळते,लेखकांची ओळख होते,शब्द भंडारात  वाढ होऊन विचार आचार करण्याची उंची वाढते.आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना होतो.वाचन असल्याने मन  व शरीर तंदुरुस्त राहते.
   या प्रेरणादायी व कौतुकास्पद  उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!!!
Share a post

0 thoughts on “वाचनसाखळी समूहाकडून गणेश तांबे यांचा गौरव-

  1. सर,आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…. आपल्या या उपक्रमाने पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली…आपले पुस्तक परिचय मनाला भावते..

  2. खूपच सुंदर..!!! सर आपल्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यामुळे आम्हा सारख्यांना प्रेरणा मिळते. अभिनंदन… ! !!!!

  3. मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक..!! आपणाकडून वाचनप्रेरणा मिळाली..असेच वाचत रहा..आपला छंद जोपासत रहा..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!