फलटण प्रतिनिधी : शंकर मार्केटमध्ये नागरीकाच्या सतर्कतेमुळे अट्टल मोबाईल चोराला पकडण्यात यश आले असून याप्रकरणी राहुल राजपूत या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहरात दि 30 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शंकर मार्केट फलटण गर्दीच्या ठिकाणी भाजी घ्यायला आलेल्या फिर्यादी अनिल चंद्रकांत भोसले रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ मलटण
व राहुल जमादार यांचा एकूण 28 हजार पाचशे रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट खिशातून चोरण्यात आले. नागरीकाच्या सतर्कतेमुळे अट्टल मोबाईल चोराला दोन्ही मोबाईलसह पकडण्यात आले. सदर चोरटा राहुल राजपूत, रा. मानवत ता. माण जि.सातारा याला फलटण पोलीसांनी अटक केली. संशयित आरोपी हा म्हसवड भागातील आहे त्याचे आणखी साथीदार असण्याची शक्यता असल्याने त्याबद्दल फलटण पोलीस तपास करीत आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याधर ठाकुर करीत आहेत.