अपघाताच्या कारणावरून डीएड चौक येथे युवकास बेदम मारहाण

फलटण प्रतिनिधी – अपघात केला आहे असे म्हणून एका युवकास दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक 29 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास डी. एड चौक येथे सागर प्रशांत दोशी, वय-34 वर्षे, रा.कोळकी ता.फलटण या युवकास तू कोळकी येथे अपघात करून आला आहे असे म्हणून 10 ते 15 जणांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी सागर दोषी यांचे वडील व भाऊ, पत्नी यांना त्याठिकाणी आले असता त्यांनाही 10 ते 15 जणांनी मारहाण केली तसेच पत्नीस धक्काबुक्की केली यानंतर तु पोलीस स्टेशनला चल असे म्हणुन सागर दोषी यांस 4 ते 5 युवकांनी हाताला धरून रस्त्याने ओढत नेवुन मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवुन मारहाण करत मलटण येथे हरिबुवा मंदीर येथे घेऊन गेले. मंदिराच्या अलिकडे रस्त्यावर थांबवून कोळकी येथे अपघात झालेली महिला व तिचे पती निलेश पवार (पूर्ण नाव माहीत नाही) व एक अनोळखी इसम यांनी हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली त्याच वेळी मनोज हिप्परकर याने हातात कोयता घेवुन सागर याला मारणेसाठी धावुन आला असता तेथे जमलेल्या लोकांनी त्यास अडवले त्यानंतर त्यांनी सागर यास वडिलांना फोन करण्यासाठी सांगितले वडिलांना फोन करून मलटण येथे येण्यास सांगितले नंतर एका युवकाने मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला काही वेळाने पोलीस गाडी व सागर याचे वडील व भाऊ आलेचे पाहून मारहाण करणाऱ्या युवकांनी सागर दोषी यास एका घरामध्ये ठेवले. पोलीस आल्यानंतर नंतर मारहाण करणाऱ्यानी सागर दोषी यास घराबाहेर घेवुन आले. यानंतर सागर जोशी याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यांच्यावर उपचार सुरू असून मनोज हिप्परकर, निलेश पवार इतर अनोळखी 10 ते 15 युवकांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पो.उ.नि. बनकर हे करीत आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!