फलटण प्रतिनिधी – एका तरुणीचा खून करून ब्लॅंकेट मध्ये नायलॉनच्या दोरीने बांधून विहिरीत टाकल्याची घटना वाजेगाव (निंबळक)येथे घडली आहे.
या बाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन दिलेल्या माहितीनुसार २०/२५ वर्षे वयाची तरुणी मृत अवस्थेत आढळून आली आहे. तिचा अज्ञात इसमाने खून केला आहे. तसेच ही माहिती उघड होऊ नये या साठी तिचा मृतदेह एका रंगीत ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून ते ब्लॅंकेट वरून नायलॉनच्या दोरीने बांधले गेले होते. तसेच त्या युवतीला एवढ्या क्रूरतेने ठार केले आहे की तिची ओळख पटवणे पोलिसांना खूप अवघड जात आहे. तसेच नेमकी ही युवती कोण आहे व तिचा कोणी खून केला आहे. या बाबत पोलीस शोध घेत आहेत. तसेच तिला इतर ठिकाणी मारून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या ठिकाणी आणले आहे का?याची पोलीस तपासणी करीत आहेत. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी दिली असून अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक बोमले करीत आहेत.