फलटण प्रतिनिधी :- तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या तेरा जणांच्या विरोधात सातारा स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत या ठिकाणी आढळलेला अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांना माहिती मिळाली की , तरडप ता.फलटण येथे काही इसम पत्यांवरती पैसे पैज म्हणून लावून जुगार खेळत आहेत . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने मिळाले बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता वैभव आण्णासो मदने, राहूल उत्तम मोरे, बापू बबन बंडलकर, सुरज नारायण रिटे,नवनाथ दयानंद गोडसे, संतोष पांडूरंग लवळे, प्रमोद मारूती शिंदे, महंमद रहमाण शेख, दत्ता. धनाजी मदने, रविंद्र शिवराम गोडसे, भाऊसो लक्ष्मण पवार, युवराज आत्माराम अलगुडे, जिवन पांडूरंग रिटे सर्व राहणार तरडप ता.फलटण हे तेरा लोकांना पत्यांवरती पैसे पैज म्हणून लावून जुगार खेळत असताना मिळून आले त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून सुमारे २ लाख ७० हजार ८७० रुपये किमतीची रोख रक्कम , मोबाईल फोन , मोटार सायकल व जुगार साहित्य हस्तगत करण्यात आले. सदर तेरा इसमांना पुढील कारवाई करीता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले . सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सफौ पृथ्वीराज घोरपडे , जोतीराम बर्गे , पोहवा विनोद गायकवाड , पोना योगेश पोळ , राजकूमार ननावरे , पोशि केतन शिंदे यांनी सहभाग घेतला होता .