फलटण प्रतिनिधी – मौजे ताथवडा गावचे हद्दित धोम बलकवडी कॅनॉल शेजारी असलेल्या पोल्ट्री फारर्मचे शेजारील झाडाखाली पत्याचे पानावर पैसे लावुन तिन पानीपत्ते नावाचा जुगार खेळत असताना पोलीसांनी सात जणांना पकडले यावेळी दोन जणांनी पळ काढला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या कारवाईत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे ताथवडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार,
मौजे ताथवडा गावचे हद्दित धोम बलकवडी कॅनॉल शेजारी असलेल्या पोल्ट्री फार्मचे शेजारी झाडाखाली काही जण पत्याचे पानावर पैसे लावुन तिन पानी पत्ते नावाचा जुगार खेळत आहेत अशी माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर दि .29 रोजी 4.30 वाजण्याच्या सुमारास पोलीसांच्या पथकाने याठिकाणी अचानक छापा टाकला असता तेथे एकञ येवुन पत्याचे पानावर पैजेवर पैसे लावुन तिन पानी जुगार खेळताना रामदास भगवान भंडलकर, प्रकाश लक्ष्मण बोधे, अंकुश महादेव बनसोडे, नागेश शरद शिंदे सर्व राहणार ताथवडा ता.फलटण ,संतोष विलास फाळके रा.फरांदवाडी ता.फलटण , नितीन बाळू मोरे रा.मंगळवार पेठ फलटण ता.फलटण, कौलास महादेव रनणवरे रा.आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण यांना जागीच पकडले व यावेळी दोन जण पळुन गेले त्यांची नावे प्रकाश लक्ष्मण बोधे यास विचारले असता गणेश भोसले व किशोर घोलप (पूर्ण नाव माहीत नाही)अशी असल्याचे सांगितले.
या ठिकाणी एकुण 5 लाख 97 हजासर 790 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य,दोन व चार चाकी वहाने व रोख रक्कमेसह मिळुन आले आहेत. सदरचा जुगार खेळताना त्यांनी एकञ जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी सातारा यांनी दिले आदेशाचे उल्लघन करुन स्वत:मास्कचा वापर न करता हयगयीने बेदारकपणे मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य केल्या प्रकरणी पोना
सहदेव मारुती तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
महाराष्ट्र जुगार अधिनियम 12(अ),भा.द.वी.स कलम 188,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थपन कायदा कलम 51 (ब),महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 प्रमाणे नऊ जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पो.हवा कदम, शिंदे, पो.ना तुपे, देशमुख ,गायकवाड,पो.कॉ जगदाळे,घोरपडे, कडोकोट यांच्या पथकाने केली.