सरडे येथे कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा

*सरडे येथे १ जुलै कृषि दिनानिमित्त व कृषि संजीवनी सप्ताह कार्यक्रम शेतकऱ्यांनच्या बांधावर शास्त्रज्ञ प्रक्षेत्र भेट मधून कृषि आधुनिक तंत्रज्ञान चा प्रसार व प्रचार करून पिकाची उत्पादकता गुणवत्ता , शेतकऱ्यांनचे उत्पन्न वाढ करणे मुख्य उद्देश आहे* ……
*प्रकाश सूर्यवंशी*
 *उपविभागीय कृषि अधिकारी* 
         *फलटण*
          
सरडे ता फलटण:  जिल्हा सातारा येथे १ जुलै कृषि दिनाचे व कृषि संजीवनी   
सप्ताह निमित्ताने औचित्य साधून शेतकऱ्यांनसाठी विविध आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनच्या बंधापर्यंत पोहोचवणे व पिकाची उत्पादकता, गुणवत्ता,व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्री चा  वापर हे मुख्य उद्देश असल्याचे १ जुलै ते ७ जुलै २०२० पर्यंत कृषि संजीवनी सप्ताह चे कृषी विभागा मार्फत आयोजन केल्याचे व कृषि तंत्रज्ञान छोट्या छोट्या बाबीचा अवलंब केल्यास पीक उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचे  यावेळी प्रकाश सूर्यवंशी उपविभागीय कृषि अधिकारी यांनी  सांगितले 
यावेळी डॉ स्वाती गुरवे पीक संरक्षण विषय विशेषतज्ञ कृषि विज्ञान केंद्र बोरगाव यांनी सोयाबीन पिकावरील कीड व रोग  नियंत्रण व एकात्मिक कीड व्यवस्थापण बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन कृषि विभागा मार्फत आयोजित श्रीमंत शेडगे यांच्या सोयाबीन प्लॉट प्रक्षेत्र भेट प्रसंगी डॉ स्वाती गुरवे यांनी सांगितले
श्री संजय पवार यांच्या कृषी विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण सन २०१९-२० अंतर्गत पेरणी यंत्राच्या सहाय्याने खत व बी एकाच वेळी पेरणी केलेले सोयाबीन व मका पीक  व शेतीशाळा प्रात्यक्षिक मका प्लॉट प्रक्षेत्र भेट यावेळी करण्यात आले
 डॉ स्वाती  गुरवे पीक संरक्षण विषय विशेषतज्ञ कृषि विज्ञान केंद्र यांनी यावेळी उपस्थित शेतीशाळा मधील शेतकऱ्यांना व गूगल मिटिंग द्वारे मका पिकांवरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण व मका पिकांवरील रोग नियंत्रण व एकात्मिक कीड नियंत्रण तसेच पक्षी थांबे बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले 
यावेळी मका पिकांवरील अमेरिन लष्करी अळी नियंत्रण माहिती पत्रक वाटप डॉ  स्वाती गुरवे पीक संरक्षण विषय विशेषयज्ञ व  प्रकाश सूर्यवंशी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण  ,  संजय धायगुडे सरपंच सरडे , सुहास रणसिंग तालुका कृषि अधिकारी फलटण , शरद भोईटे पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्या हस्ते वाटप  करण्यात आले
श्री शरद भोईटे डॉ जे के बसु सेंद्रिय शेती व आधुनिक शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी जे  गेले २० वर्ष कमी खर्चात व कमी वेळेत मोठया प्रमाणात गांडूळखत व व्हर्मीव्हाश तंत्र विकसित केलेल्या प्रकल्पास यावेळी भेट देण्यात आली  
श्री शरद भोईटे यांनी यावेळी गांडूळखत व  व्हर्मीव्हाश तयार करण्याचे तंत्रज्ञान बाबत सविस्तरपणे माहिती दिली
श्री धनराज यजगर कृषि पदवीधर शेतकरी यांच्या ड्रायगणफुड व उडीसा जातीचा शेवगा लागवड कमी पाण्यातून जास्त उत्पादन व ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब या प्रक्षेत्र भेट प्रसंगी श्री धनराज यजगर यांनी घेतलेल्या अंतर पीक बाबत व शेवगा विक्री माहिती यावेळी दिली तसेच कृषि विभागाचे सहकार्य असलचे सांगितले 
 डॉ स्वाती गुरवे यांनी शेवगा पिकावरी  कीड रोग बाबत सविस्तरपणे माहिती दिली
डॉ प्रसाद जोशी हॉस्पिटल फलटण यांच्या मार्फत मोफत  २५ शेतकरी प आंबा, नारळ ,सीताफळ, लिबु  व मास्क चे कृषि दिनानिमित्त मका पीक शेतीशाळा मध्ये सहभागी व इतर शेतकऱ्यांना डॉ स्वाती  गुरवे  पीक संरक्षण विषय विशेषतज्ञ कृषि विज्ञान केंद्र बोरगाव ,मा  प्रकाश सूर्यवंशी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण , मा संजय धायगुडे सरपंच सरडे मा सुहास रणसिंग तालुका कृषि अधिकारी फलटण , मा फिरोज शेख तंत्र अधिकारी , मा  पूजा दुदुसकर मंडळ कृषि अधिकारी तरडगाव , मा भरत रणवरे मंडळ कृषि अधिकारी बरड, मा गीता लावंड कृषि अधिकारी पंचायत समिती फलटण , मा माहानगडे कृषि अधिकारी पंचायत फलटण, मल्हारी नाळे ,दत्तात्रय एकळ कृषि पर्यवेक्षक  यांच्या हस्ते आंबा, नारळ , सीताफळ, लिंबू या कलमे ,रोपे वाटप करण्यात आले 
कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम चे संपूर्ण पणे ऑनलाईन गुगल मिटिंग च्या माध्यमातून रबविण्यात आले 
कोरोना महामारी रोगा मुळे शेतकऱ्यांनची जास्त गर्दी होऊ नये म्हणून या ऑनलाईन माध्यमाचा देखील वापर करण्यात आले होते 
यावेळी श्री संजय पवार , सचिन बेलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले 
प्रक्षेत्र भेटी मध्ये खालील प्रमाणे मान्यवर व पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते 
मा संजय धायगुडे सरपंच सरडे  मा  प्रकाश सूर्यवंशी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण , डॉ स्वाती  गुरवे  पीक संरक्षण विषय विशेषयज्ञ बोरगाव,  ,मा सुहास रणसिंग तालुका कृषि अधिकारी फलटण , मा फिरोज शेख तंत्र अधिकारी , मा  पूजा दुदुसकर मंडळ कृषि अधिकारी तरडगाव , मा भरत रणवरे मंडळ कृषि अधिकारी बरड, मा गीता लावंड कृषि अधिकारी पंचायत समिती फलटण , मा माहानगडे कृषि अधिकारी पंचायत  समिती फलटण, श्री मल्हारी नाळे कृषि पर्यवेक्षक बरड, श्री सचिन जाधव कृषि सहायक राजाळे व अधिकारी , कर्मचारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!