फलटण : फलटण पंचायत समिती फलटण येथे1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी DBT योजनेतून मका व बाजरी या बियाणे साठी अनुदान आहे तथापि तालुक्यातील शेतकऱ्यांना मूग, उडीद किंवा तूर या सारख्या कडधान्य यांनाही अनुदान देणेबाबत सूचना त्यांनी केल्या.
श्री प्रकाश सूर्यवंशी उविकृअ , डॉ अमिता गावडे गविअ, सुहास रणशिंग ताकृअ, यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्री दीपक महांगडे विस्तार अधिकारी कृषी यांनी केले,
सदर कार्यक्रमाचे नियोजन श्रीम गीता लावंड यांनी केले, सदर कार्यक्रमास कृषी विभाग अधिकारी कर्मचारी, प स अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते