सातारा दि. 30 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 20 नागरिकांचा आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला, तुळसण येथील 54 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला
जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय महिला, शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40, 56 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक
माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय महिला
सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष, राजापुरी येथील 31 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका यांचा समावेश आहे.
240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 26, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 25, शिरवळ येथील 32, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 19, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 2 व पाटण येथील 4 असे एकूण 240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दोन बाधितांचा मृत्यु
काल रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या दोघांना 10 दिवसापूर्वी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दाखल करण्यात आले होते.
▪️घेतलेले एकुण नमुने 13240
▪️एकूण बाधित 1044
▪️घरी सोडण्यात आलेले 740
▪️मृत्यु 45
▪️उपचारार्थ रुग्ण 259
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!