हिंगणगाव सूळवस्ती येथील आंदोलन तीव्र करण्याचा खा . नाईक-निंबाळकर यांनी दिला इशारा

फलटण : आगामी दोन दिवसात प्रिमियम चिक फिड पोल्ट्रीमधील सर्व पक्षी बाहेर काढून डिसपोज करून सर्व पोल्ट्री फार्म स्वच्छ करावा पशुवैद्यकीय खात्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे , अशी मागणी करत यापुढे पोल्ट्रीपासून महिला व ग्रामस्थांना त्रास झाला तर आपण स्वतः आंदोलनात उत्तरणार असून आपला हा अंतिम इशारा असल्याचे खा , रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी स्पष्टपणे बजावले . ग्रामस्थांच्या आंदोलनास खा . रणजितसिंह यांचा पाठिंबा सूळवस्ती , हिंगणगाव , ता . फलटण येथील प्रिमियम चिक फिड पोल्ट्री फार्ममुळे तेथील ग्रामस्थांना गेली १० वर्षे मरणयातना सहन कराव्या लागत आहेत . ग्रामस्थांनी आज सोमवार दि . २ ९ जून रोजी पोल्ट्रीसमोर बेमुदत धरणे आंदोलन व उपोषणाला सुरवात केली असता खा , रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली . यावेळी प्रांताधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे ,

लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी , भाजप तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर , जयकुमार शिंदे , पै . बजरंग गावडे , विलासराव झणझणे , राजेंद्र काकडे , हिंगणगावचे सरपंच मारुती खुडे , माजी उपसरपंच डॉ . पदमराज भोईटे , धोंडिबा कारडे , संजय सूळ यांच्यासह हिंगणगाव , कापशी , आदर्की , आनंदगाव ( शेरीचीवाडी ) परिसरातील शेतकरी , ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या . जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेणे दुर्दैवी पोल्ट्रीबाबत जिल्हाधिकारी , सातारा यांना सविस्तर अहवाल पाठवून देखील त्यांनी दखल घेतली नाही हे दुर्दैवी आहे . एका लहान मुलाचा माशांमुळे जीव गेला आहे . प्रशासनाने गांभीर्याने प्रश्नाचा अभ्यास करून पोल्ट्रीला क्लोझर नोटीस काढावी 
अशी मागणी करत मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री यांना स्वतः भेटून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे यावेळी खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले . व्यवसाय टिकला पाहिजे पण इतरांना त्रास न होता पोल्ट्री फार्ममुळे ग्रामस्थ , महिला , मुले कोणालाही त्रास होणार नाही यासाठी पोल्ट्री मालकांना नोटीस काढावी . व्यवस्थापन ऐकत नाही तर आम्ही येथे गोड बोलण्यास आलो नाही , यावर उपाययोजना लवकरात लवकर करावी . व्यवसाय टिकला पाहिजे हे जरी खरे असले तरी इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मालक व शासन प्रशासनाने लक्षात घ्यावे . अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिला ,
पशुसंवर्धन विभागाचा अहवाल घेऊन कार्यवाहीची प्रशासनाची ग्वाही प्रिमियम चिक फिडस पोल्ट्री फार्म विरोधात सूळवस्ती ग्रामस्थ महिला यांनी निवेदन दिल्याच्या अनुषंगाने मागे प्रांताधिकारी कार्यालयातून १३३ अंतर्गत अर्ज केला आहे . सेशन कोर्ट येथे सदरची केस प्रलंबित आहे . पशुसंवर्धन तांत्रिक विभागामार्फत तपासणी करण्याबाबत सूचना केल्या आहेत . जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुसंवर्धन उपायुक्त यांनी देवून पाहणी करून अहवाल दिल्यावर पुढील कारवाई करण्याची ग्वाही प्रांताधिकारी डॉ शिवाजीराव जगताप यांनी यावेळी दिली . १० वर्षे मरणयातना भोगल्या आता सहन होत नाही गेली १० वर्षे आम्ही व आमची लेकरे या पोल्ट्रीमुळे निर्माण झालेल्या वातावरणात जीवन – मरणाचा खेळ खेळतो आहोत . आता आमची मानसिकता व क्षमता संपुष्टात आली आहे याचा विचार करून आम्हाला न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी , रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्याकडे केली . १० वर्षे सणवार नाही , कशी तरी चटणी- भाकरी खातोय माशांमुळे स्वयंपाक करता येत नाही व खाता येत नाही , आम्ही १० वर्षे कोणता सण साजरा केला नाही , चटणी- भाकरी खाऊन दिवस काढत असून येथील दमा व इतर आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने 
जगण्याची खात्री राहिली नाही . दूध व शेती व्यवसाय बंद झाला असून आमची जनावरे व माणसे यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची गा – हाणी आंदोलनकर्त्या महिलांनी खा . रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्यासमोर मांडली . माणसांपेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या आहेत का ? सूळवस्ती , हिंगणगाव , ता . फलटण येथे १० वर्षापासून प्रिमियम चिक फिडस पोल्ट्री फार्म सुरू असून व्यवस्थापनाने केलेल्या दुर्लक्षामुळे परिसरात दुर्गधी माशांचा त्रास वाढल्यामुळे ग्रामस्थ , महिला व तरुण आक्रमक झाले आहेत . आंदोलन स्थळी पशुसंवर्धन उपायुक्त उशिरा येणार असल्याने पोल्ट्री कामगारांना आत सोडावे , असे लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी आंदोलनकर्त्या महिलांना सांगताच महिलानी आक्रमक होऊन आम्ही १० वर्ष मरण यातना भोगतोय व तुम्हाला माणसापेक्षा कोंबड्या महत्वाच्या वाटत असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत कामगारांना आत सोडण्यास नकार दिला .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!