फलटण दि.३० : फलटण मेडिकल फौंडेशन संचलित येथील रक्तपेढीच्या रक्त विघटन प्रयोगशाळा *ब्लड कंपोनंट लॅब* च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते मंगळवार दि.३० जून रोजी दुपारी ४ वाजता रक्त पेढीच्या सभागृहात करण्यात येणार आहे, यावेळी विशेष अतिथी म्हणून सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष, मा.नगराध्यक्ष मा.श्री.दिलीपसिंह भोसले, मा.श्री.अरविंदभाई मेहता विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फलटण मेडिकल फौंडेशन पदाधिकारी सर्वश्री मा.डॉ.बिपीन शहा, मा.डॉ.श्रीकांत करवा, मा.डॉ.संतोष गांधी, मा.डॉ.दत्तात्रय देशपांडे हे यावेळी पाहुण्यांना नवीन प्रकल्पाविषयी माहिती देतील.