मुंबई (फलटण टुडे वृत्तसेवा ) : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्याटप्याने शिथीलता दिली जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत काय सुरू काय बंद
दरम्यान, मुंबईसह एमएमआर परिसरात पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगांव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना, तसेच कार्यालयात जाणाऱ्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. खरेदीसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.
हे सुरू असणार :-
सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ५ ते संध्याकाळी ७ या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे.
केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.
सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही.
केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.
सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत
हे बंद असणार
मास्क घालून चेहरा झाकणे अनिवार्य
सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक
दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी
लग्नाला ५० पेक्षा जास्त पाहुणे नाही, तर अंत्ययात्रेला ५० पेक्षा जास्त माणसांची गर्दी नाही
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध
कार्यालयासाठी अशा आहेत सूचना
सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान १५ टक्के कर्मचारी वर्ग किंवा किमान १५ कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.
शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाजे यासारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात.
दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी.
हे आहे बंधनकारक
मास्क घालून तोंड झाकणे अनिवार्य
लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असणार आहे.
सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक
दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध
शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे
कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाज्यांसारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात
दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी