हणमंतवाडी गावातील विविध विकास कामांचे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी केले कौतुक

आसु : अप्पर जिल्हाधिकारी मनिषा ओव्हाळ मॅडम, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी गावडे मॅडम फलटणचे तहसीलदार यांची हणमंतवाडी गावातील विविध विकासकामांना भेट दिली देशातील पहिला एकत्रित घरकुल प्रकल्प, जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायत कार्यालय इतर शासकीय कार्यालये बिहार पॅटर्न वृक्षलागवड, जलसंधारण ओढा खोलीकरण रुंदीकरण बंधारे बांधकाम, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण कृषी महिला सक्षमीकरण नरेगा अंतर्गत झालेली कामे अशा विविध योजना विषयाची झालेली कामे आणि गावात राबविल्या जाणाऱ्या भविष्यातील योजना या विषयी चर्चा करण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी मॅडम यांनी विविध कामाचे ग्रामपंचायतने राबविलेल्या योजनांचे कौतुक केले विशेषतः १२० घराच्या एकत्रित घरकुल प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी उपस्थित मंडलाधिकारी श्री देवकाते गावकामगार तलाठी श्री गायकवाड, ग्रामसेविका सौ गपाट मॅडम, नरेगा अधिकारी श्री पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष श्री नारायण पवार, ग्रामपाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष श्री संदिप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण शिंदे, श्री हणमंत साठे, मा ग्रा पं सदस्य श्री राजेंद्र शिंदे सोसायटीचे संचालक श्री राजकुमार साबळे, श्री धनाजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते श्री सागर शिंदे,श्री पांडुरंग धाईजे, श्री विकास निकाळजे, श्री महेश येडवे व ग्रामस्थ श्री गणेश चव्हाण महादेव बहिरमल हरीचंद्र लोंढे व इतर ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हणमंत पवार दगडू पवार नवनाथ मसुगडे संतोष सुळ उपस्थित होते…

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!