शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संजीवराजेंना विधानपरिषदेवर संधी मिळावी – प्राथ.शिक्षक समिती

फलटण : शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी,अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती फलटणचे अध्यक्ष श्री भगवंतराव कदम व सरचिटणीस श्री गणेश तांबे ,सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षिका यांनी केली आहे.
संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी श्रीमंत संजीवराजे यांनी पहिल्यापासूनच खूप प्रयत्न केले आहेत.त्याचप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना शैक्षणिक गुणवत्ता
वाढीसाठी,क्रीडाक्षेत्रासाठी,नावीन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम अधिकारी यांच्यामार्फत राबविले आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा शैक्षणिक ,क्रीडा,आरोग्य बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेला आपणास दिसून येतो. तसेच केवळ फलटण तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांच्या सामाजिक,शैक्षणिक व आरोग्यविषयी कोणत्याही अडचणी संदर्भात अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले आहेत .श्रीमंत संजीवराजे यांना शिक्षकांच्या व ग्रामीण भागातील मुलांच्या प्रश्नांची जवळून माहिती असल्यामुळे आणि त्या सोडवण्यासाठी त्यांची सातत्याने प्रयत्नशील अशी भूमिका असल्यामुळे श्रीमंत संजीवराजे यांना विधानपरिषदेवर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी संधी देण्यात यावी अशी मागणी शिक्षक समिती फलटणच्या सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.
Share a post

0 thoughts on “शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संजीवराजेंना विधानपरिषदेवर संधी मिळावी – प्राथ.शिक्षक समिती

  1. अतिशय योग्य निर्णय ! सर्वांची साथ त्यावर होईल मत! जय शिक्षक समिती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!