श्री.सचिन रणवरे, पंचायत समिती सदस्य फलटण यांचे वतीने झिरपवाडी, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रूक , सासकल, सोनवडी बुद्रूक ,सोनवडी खुर्द या गावात अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे मोफत वाटप….!!
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रभावी ठरलेले व आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष,विधान परिषद महाराष्ट्र राज्य ,श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर,
चेअरमन,कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण,
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी अध्यक्ष जि. प.सातारा, आ.दिपकराव चव्हाण,फलटण-कोरेगाव विधानसभा यांचे मार्गदर्शनाने .
श्री.सचिन रणवरे, पंचायत समिती सदस्य फलटण यांच्या वतीने यावेळी झिरपवाडी, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रूक , सासकल, सोनवडी बुद्रूक या गावासह अंतर्गत वाड्या-वस्त्यांवरील सर्व कुटुंबीयांना या औषधाचे मोफत वितरण करून हे औषध घेण्याबाबतची ची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
अडचणीच्या काळात नेहमीच गावातील लोकांच्या मदतीला धावून येणारे श्री.सचिन रणवरे यांनी समाजाप्रती असलेले कर्तव्य म्हणून यापूर्वी अनेक गरजू कुटुंबीयांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कले व सोशल डिस्टन्स चे नियम काटेकोरपणे पाळावेत अशी विनंती केली .
या वेळी सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमांचे कौतुक केले व आभार मानले.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!