फलटण – अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या मॅग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने कोरोनाचा पार्श्वभूमीवर लोकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी खास ग्राहकांच्या सोयीसाठी आर्थिक गरज/सहकार्य व्हावे या साठी मॅग मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी येथे सोने तारण कर्ज योजना आखली असून प्रति तोळा तब्बल 40 हजार रुपये कर्ज मिळेल अशी माहिती मॅग मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनिलशेठ मोहोटकर यांनी दिली आहे.
दरम्यान सातारा सोलापूर जिल्हा तसेच पुणे सह बेळगावात सर्वांना आपली आर्थिक सहाय्य देणारी अग्रगण्य संस्था म्हणून परिचित असलेल्या मॅग मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीने ग्राहकांना सोने गहाण कर्ज उपलब्ध करुन देत प्रतितोळा 40 हजार रुपये देत असून दहा मिनिटात सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. दरम्यान ही सोनेतारण कर्ज सुविधा सर्व शाखेत सुरू आहे.तसेच या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे छुपे चार्जेस नाहीत.तसेच जेवढे दिवस कर्ज तेवढेच दिवस व्याज अशी सुटसुटीत योजना आखली असून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी अग्रेसर असलेल्या मॅग मल्टिस्टेट को ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये वाहन कर्ज तसेच इतर खरेदीसाठी आकर्षक योजना असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मॅग मल्टिस्टेट च्या वतीने करण्यात आले आहे. ही सुविधा सातारा,पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाखांसाह कर्नाटक येथील संकेश्वर बेळगाव येथे उपलब्ध आहे. तसेच ग्राहक या मध्ये पार्ट पेमेंट(थोडे थोडे)भरू शकतील अशी खास सवलत /सूट उपलब्ध असणार आहे.
याच बरोबर ग्राहकांना आर. टी. जी. एस.(RT GS) तसेच एन. ई. एफ. टी.(NEFT)सुविधा उपलब्ध आहे. तरी सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन मॅग मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटीच्या वतीने करण्यात आला आहे.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!