फलटण :- जनावरांची कत्तल करुन त्याचे मांस वाहतूक करताना 15 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या पथकाने अटक केली आहे
फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण हे दिनांक २२ रोजी त्यांचे स्टाफसह जिल्हा रात्रगस्त करत असताना रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर फलटण ता. फलटण येथील मदरसाचे पाठीमागे त्यांना तीन वाहने संशयितरित्या दिसुन आली.म्हणुन त्यांनी सदरची वाहने थांबवली असता दोन बोलेरो पिकअप गाडी पैकी एका गाडीवरील ड्रायव्हर गाडी तेथेच सोडुन पळुन निघुन गेला. दुसऱ्या बोलेरो पिकअप गाडीचा चालक व टाटा ४०७ गाडीचा चालक यांना तानाजी बरडे यांनी जागीच पकडुन ताब्यात घेतले. त्यांनी गाडीची तपासणी केली असता बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच.११.बी.एल.१६२९ मध्ये दोन जिवंत जर्शी गायी मिळुन आल्या तर बोलेरो पिकअप क्रमांक एमएच.१४.ए.एस.३३८६ मध्ये सुमारे ४०० किलो व टाटा ४०७ गाडी क्रमांक एम.एच.१२.सी.टी.९८०४ मध्ये सुमारे ८०० किलो जनावरांची कत्तल करुन त्याचे मांस कोणत्याही परवान्याशिवाय चालवले होते यावेळी आसिफ पिरमहम्मद शेख रा. पुणे व सुफियान रफिक बागवान रा. पुणे अशी असलेबाबत सांगीतले व सदरचा माल हा इरफान चाँद कुरेशी रा. फलटण यांचे सांगणेवरुन घेऊन निघालो होतो असे सांगीतले.तानाजी बरडे यांनी नमुद आरोपींचेकडुन १५,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असुन जिवंत दोन जनावरे गोशाळेत सुरक्षीततेच्या दृष्टीने जमा करण्यात आली आहेत.
सदर कारवाईमध्ये तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, प्रताप पोमण पोलीस निरीक्षक, सचिन राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस स्टेशन, नितीन भोसले पोलीस नाईक, किशोर चन्ने पोलीस हवालदर, दत्तात्रय कुंभार चा.पोलीस कॉन्स्टेबल. कृष्णाजी जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल, भास्कर पिचड असे होते. सदर प्रकरणी पोकॉ. भास्कर पिचड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सचिन राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!