फलटण प्रतिनिधी :- सातारा , पुणे ग्रामिण , सोलापूर ग्रामिण जिल्हयातील घरफोड्यातील व जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीस फलटण शहरातून स्थानिक गुन्हे शाखा , सातारा पथकाने अटक केल्याने अनेक गुन्हे उघडण्यास मदत होणार आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि .१९ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी चोरी करणारा इसम कोळकी फलटण परिसरात वावरत असून त्या आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जन्हाड व त्यांचे पथकास दिले. त्यानुसार तपास पथकाने फलटण शहर परिसरामध्ये सापळा लावून मिळालेल्या माहितीनुसार त्या आरोपीस ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने व त्याचे साथिदार यांनी फलटण ग्रामिण , फलटण शहर , पुणे ग्रामिण जिल्हयातील वडगाव निंबाळकर , भिगवण परिसरामध्ये घरफोडी चोऱ्या , जबरी चोरी , मोटार सायकल चोरी असे एकूण ६ घरफोडी चोरी , १ जबरी चोरी व १ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच संबधित आरोपींनी पुणे ग्रामिण जिल्हयातील जेजूरी , सोलापूर जिल्हयातील फलटण ते माळशिरस जाणारे रोडवरील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सोन्याचे दागिणे चोरी केले असल्याचे सांगीतले तसेच वेळापूर , माळशिरस परिसरात देखील आणखी घरफोडी चोऱ्या केल्या असल्याचे सांगीतले. आजअखेर संबधित आरोपीच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ गुन्हे, फलटण शहर पोलिस ठाण्यात १ तर फलटण पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात २ असून पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड , स.फौ.उत्तम दबडे , पो.हवा.तानाजी माने , मुबीन मुलाणी , विजय कांबळे , पो.ना.शरद बेबले , नितीन गोगावले , प्रविण फडतरे , प्रमोद सावंत , रविंद्र वाघमारे , मुनीर मुल्ला , अर्जुन शिरतोडे , विक्रम पिसाळ, चा.पो.ना.संजय जाधव, विजय सावंत यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!